एफआरपी प्रति क्विंटल २९० रुपये;ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी

एफआरपी प्रति क्विंटल २९० रुपये;ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Published by :
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत उसाची एफआरपी (रास्त आणि मोबदला देणारी किंमत) प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

उसाची एफआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अलीकडेच अन्न मंत्रालयाने याबाबत कॅबिनेट नोट जारी केली होती. गेल्या सीझनमध्ये केंद्र सरकारने एफआरपी 10 रुपये प्रति क्विंटल वाढवून 285 रुपये केली होती.या निर्णयाचा ५ कोटी शेतकरी आणि त्यावर अवलंबून थेट साखर कारखान्यात काम करणारे सुमारे पाच लाख कामगार, याशिवाय ऊसतोड कामगार तसेच संबंधित वाहतुकीसाठी काम करणाऱ्यांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

दरम्यान ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रति टन 50 रुपयांची वाढ करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाची दरवाढीला मंजुरी दिली आहे. केंद्राच्या निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली आहे. 50 रुपयांनी काय होणार, 500 रुपयांची वाढ हवी!, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com