अण्णा हजारे यांचे अमित शहा यांना पत्र; साखर कारखान्यांच्या २५ हजार कोटीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची केली मागणी

अण्णा हजारे यांचे अमित शहा यांना पत्र; साखर कारखान्यांच्या २५ हजार कोटीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची केली मागणी

Published by :
Published on

संतोष आवारे, अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना एक पत्र पाठवून चौकशीची मागणी केली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा हजारे यांचा आरोप आहे. याची चौकशी आता केंद्रीय सहकार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.अण्णा Anna Hazare राळेगणसिद्धीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील अनेक पक्ष पार्ट्यांचे लोक आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांनी आपल्या भाग भांडवल आणि जमिनी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेऊन अंदाजे 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा आणि सहकार क्षेत्र मोडीत काढून खाजगीकरण वाढीला लावले त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी करणारे पत्र जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे Anna Hazare यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा Amit Shah यांना पाठवले आहे. या पत्राची आणखीण एक प्रत अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धाडली आहे.

सत्याग्रह आंदोलनाचा इशारा

अण्णा हजारे Anna Hazare यांनी सहकारी साखर कारखाने विक्री घोटाळ्यावरही भाष्य केले.साखर कारखाने बंद पडले नाही तर बंद पाडले गेले असा आरोप करत या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा माझ्या मार्गाने मी जाईल असे सांगत अण्णांनी आपल्या सत्याग्रह आंदोलनाचा इशारा दिलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com