Students from Ukraine landed in Delhi| युक्रेनमधून 250 भारतीयांसह दुसरी इव्हॅक्युएशन फ्लाइट दिल्लीत
एअर इंडियाचे (Air India) दुसरे विमान युक्रेनमध्ये (Students Stuck Ukraine) अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत विमानतळावर पोहोचले आहे. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअर इंडियाचे दुसरे निर्वासन विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळावर निर्वासितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने यूक्रेन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याची मोहिम हाती घेतली.
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने शनिवारी ट्विटरवर सांगितले की, युक्रेनमधील भारतीय नागरिकांनी हेल्पलाइन क्रमांक वापरून तेथील भारतीय सरकारी अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमा चौकीवर जाऊ नये."विविध सीमेवरील चौक्यांवर परिस्थिती संवेदनशील आहे आणि दूतावास आमच्या शेजारील देशांमधील आमच्या दूतावासांसोबत आमच्या नागरिकांना समन्वितपणे बाहेर काढण्यासाठी सतत काम करत आहे,"