तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळले
पश्चिम बंगालमधील (West Bangal) बीरभूम जिल्ह्यातील दुर्देवी घटना समोर आली आहे. रामपूरहाट येथे टीएमसी (TMC)नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर टीएमसी कार्यकर्ते संतप्त झाले आणि परिसरात हिंसाचार (violent)पसरला. त्यांनी 10-12 घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. या आगीत 10 जण जिवंत जळाल्याची माहिती आहे. यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री घडली आहे. यामध्ये 10-12 घरे जळाली आहेत. एकूण 10 लोकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकाच घरातून 7 लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. कथितपणे रामपूरहाटमध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याच्या हत्येनंतर जमावाकडून घरे पेटवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
भादू शेख तृणमूल काँग्रेसचे नेते होते. त्यांच्यांवर बाँबने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.