अडीच महिन्यानंतर शेअर बाजार ६० हजारांवर
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह (stock market)उघडला. सकाळी चांगल्या ओपनिंगनंतर सेन्सेक्स (bse)आणि निफ्टी (nse)दोन्ही निर्देशांकांत मोठी वाढ झाली आहे. तब्बल अडीच महिन्यांच्या काळानंतर सेन्सेक्सने (sensex) पुन्हा एकदा 60 हजार , तर निफ्टीने 18 हजार टप्पा ओलांडला आहे. सकाळी 10:45 वाजता, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 1424 अंकांनी (2.40%) वाढून 60,701 वर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 371 (2.1%) अंकांच्या वाढीसह 18,041 वर व्यवहार करत आहे. 18 जानेवारी 2022 नंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 60000 आणि 18000 चा टप्पा गाठला आहे. (Sensex crosses 60,000 and Nifty crosses 18,000)
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 488 अंकांच्या वाढीसह 59,764 वर उघडला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी देखील 139 अंकांच्या वाढीसह 17,809 वर उघडला. एचडीएफसी, बजाज फायनान्स, टायटन, एशियन पेंट्स या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. बँक शेअर्स वाढले आणि ऑटो घसरले.
ऑटो आणि आयटी निर्देशांक लाल चिन्ह
निफ्टीच्या 11 पैकी 9 क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात आहेत. तर दोन निर्देशांक ऑटो -0.05% आणि आयटी निर्देशांक (-0.19%) खाली आहेत. यामध्ये फायनान्शियल सर्व्हिसेसला सर्वाधिक ४.२२%, तर निफ्टी बँकेला ३% ची वाढ झाली आहे. खाजगी बँक 2.77% वर आहे. रियल्टी निर्देशांक 0.20% वाढला. दुसरीकडे, मीडिया 0.12% वर आहे, आणि FMCG निर्देशांक 0.17% वर आहे.