यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम कोरोना पॉझिटिव्ह
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथमला कोरोनाची लागण झाली आहे. नवीन चाचणीनंतर हो दोघे पॉझिटिव्ह आढळले आहेत. एका वृत्तसंस्थेनं या संदर्भातील बातमी दिली आहे.
चहल आणि गौथम यांच्या चाचणीचा निकाल आज शुक्रवारीच आला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका सरकारच्या प्रोटोकॉलनुसार, जो खेळाडू पॉझिटिव्ह येईल त्याला १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. यानंतर, ते निगेटिव्ह चाचणीनंतरच देश सोडू शकतात. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला ७ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागते.
दरम्यान याआधी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला कोरोना झाला आहे. त्यानंतर कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळांडूना क्वारंटाइन करण्यात आले होते. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृष्णप्पा गौथम, मनीष पांडे, इशान किशन, यजुर्वेंद्र चहल हे खेळाडू कृणालच्या संपर्कात आले होते.