वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा; अजिंक्य रहाणेचे पुनरागमन
Admin

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा; अजिंक्य रहाणेचे पुनरागमन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताचा 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी विजेतेपद अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

7 ते 11 जून दरम्यान जागतिक कसोटी स्पर्धा खेळवली जाणार आहे. सव्वा वर्षानंतर अजिंक्य रहाणेने भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा

ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com