WTC Final Day 6 Live : भारताने घेतली 100 धावांची आघाडी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत भारताने दुसऱ्या डावात 100 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या मैदानात रवींद्र जाडेजा आणि ऋषभ पंत आहे. तसेच ऋषभ पंत कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भारत आता किती मोठी धावसंख्या उभारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाचव्या दिवसअखेर 2 बाद 64 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताने उपाहारापर्यंत विराट कोहली (13), चेतेश्वर पुजारा (15) आणि अजिंक्य रहाणेला (15) गमावले. हे स्टार खेळाडू स्वस्तात माघारी परतल्यानंतर ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सांभाळला आहे. उपाहारापर्यंत भारताने सुरूवात केल्यानंतर धावसंख्या 5 बाद 138 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताकडे 106 धावांची आघाडी घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – सर्वबाद २१७ (विराट कोहली ४४, अजिंक्य रहाणे ४९ काईल जेमीसन ५/३१)
न्यूझीलंड पहिला डाव – सर्वबाद २४९ (डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यमसन ४९ मोहम्मद शमी ४/७६)