क्रीडा
WTC Final Day 2 Live : भारताच्या फलंदाजीला सुरुवात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला असून भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कालपासून सुरू होणार होता, मात्र पावसाने हजेरी लावल्याने या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. मात्र आता दुसऱ्या दिवशी पाऊस ओसरला असल्याने पावसाला सुरुवात झाली आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली आहे. रोहित शर्मा 17 तर शुभमन गिल 8 धावावर खेळत आहे.
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.