WPL 2023: मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएलवर कोरले नाव
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पहिली महिला आयपीएल जिंकली आहे. दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएलवर आपले नाव कोरले आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने दिलेले 132 धावांचे आव्हान मुंबईने सात विकेट राखून सहज पार केले. मुंबईकडून गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी पाहायला मिळाली.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाली मुंबईच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 37 धावा केल्या. मेली केर हीने नाबाद 14, हॅली मॅथ्यूज हीने 13 आणि यास्तिका भाटीयाने 4 धावांचं योगदान दिलं. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासेन या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन| हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, राधा यादव आणि शिखा पांडे.