सचिन तेंडुलकरच्या हातात 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्ड कप ट्रॉफी; ICCच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी झाली नियुक्ती

सचिन तेंडुलकरच्या हातात 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्ड कप ट्रॉफी; ICCच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी झाली नियुक्ती

टीम इंडियाने अखेरचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2011 साली जिंकला होता. तब्बल 6 व्या स्पर्धेत सचिनचं देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आता सचिन तेंडुलकर पुन्हा आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

उद्यापासून क्रिकेटच्या वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. अशातच आता आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) याची वर्ल्ड कपसाठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी याची घोषणा केलीये. सचिनने आपल्या कारकिर्दीत भारताकडून सहा वेळा एकदिवसीय विश्वचषक खेळला आहे आणि यंदाचा वर्ल्ड कप देखील इथंच खेळवला जाणार असल्याने सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलेला दिसणार आहे.

गुरुवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर विश्वचषक ट्रॉफीसह मैदानात उतरेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचं घोषित करेल. तेंडुलकरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, '1987 मध्ये बॉलबॉय पासून ते सहा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत विश्वचषकाचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. 2011 मध्ये विश्वचषक जिंकणे हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण होता.

सचिन तेंडुलकरने सांगितलं की, विश्वचषकासारख्या स्पर्धा युवा खेळाडूंना खूप प्रेरणा देतील. भारतात होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत अनेक मातब्बर संघ आणि खेळाडू जोरदार मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. या महान स्पर्धेची मी आतुरतेने वाट पाहत आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा युवा खेळाडूंना प्रेरणा देतात. मला आशा आहे की यावेळी ही स्पर्धा तरुण मुली आणि मुलांना खेळात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्यास प्रेरित करेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com