कोहलीने मोडला सचिनचा 'विराट' विक्रम; सेमीफायनलमध्ये दमदार शतक

कोहलीने मोडला सचिनचा 'विराट' विक्रम; सेमीफायनलमध्ये दमदार शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे.
Published on

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. यासोबत विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. यामध्ये कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. कोहलीने 279 व्या डावात आपली 50 वनडे शतके पूर्ण केली आहेत.

कोहलीने मोडला सचिनचा 'विराट' विक्रम; सेमीफायनलमध्ये दमदार शतक
रोहित बनला नवा 'सिक्सर किंग'; ख्रिस गेलला टाकलं मागे

सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावली होती. तर, विराट कोहलीने न्यूझीलंडविरुध्द शतक करत तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. या खेळीदरम्यान कोहलीने इतरही अनेक खास विक्रम केले. कोहली आता विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

कोहलीने 80 धावा करताच सचिनचा आणखी एक विक्रम मोडला. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या. कोहली विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक अधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीतही कोहलीने 2003 च्या मोसमात 7 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

दरम्यान, विराट कोहली शानदार इनिंग खेळून बाद झाला आहे. कोहली 113 चेंडूत 117 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीला वेगवान गोलंदाज टीम साऊदीने पॅव्हेलियनमध्ये परतवले. 44 षटकांत भारताची दोन गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा आहेत. तर शुभमन गिलला दुखापत झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com