Women's World Cup Hockey Tournament : महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताचा विजय

Women's World Cup Hockey Tournament : महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताचा विजय

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून दोन्ही संघांमध्ये गोल करण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. नवनीत कौरने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत जपानवर ३-१ असा विजय मिळवला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या (Women's World Cup Hockey Tournament ) पहिल्या सामन्यापासून दोन्ही संघांमध्ये गोल करण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. नवनीत कौरने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत (Women's World Cup Hockey Tournament ) जपानवर (Japan) ३-१ असा विजय मिळवला.

भारताच्या वंदना कटारियाने जपानच्या गोलजाळ्याजवळ दिशेने चेंडू मारला, मात्र जपानच्या गोलरक्षकाने तो रोखला. भारताने जपानची ही आघाडी फार काळ टिकू दिली नाही. नवनीतने निर्णायक क्षणी गोल केल्याने मध्यांतराला सामना १-१ असा बरोबरीत आणला. भारताच्या बचावफळीने जपानला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली आणि आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत सामना जिंकला.

नवनीतने (३०व्या मिनिटाला, ४५व्या मि.) दोन मैदानी गोल केले, तर दीप ग्रेस एक्काने (३८व्या मि.) पेनल्टी कॉर्नरच्या साहाय्याने गोल करत संघाच्या विजयात योगदान दिले.

Women's World Cup Hockey Tournament : महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताचा विजय
Ram Gopal Varma : “मी गे नाही मात्र…”, ‘या’ अभिनेत्याला राम गोपाल वर्मा यांना करायचं होतं किस
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com