Women T20 World Cup 2024: भारताने नकार दिल्यानंतर 'या' देशात होऊ शकते महिला T20 विश्वचषक स्पर्धा

Women T20 World Cup 2024: भारताने नकार दिल्यानंतर 'या' देशात होऊ शकते महिला T20 विश्वचषक स्पर्धा

ICC ची पुढील मोठी स्पर्धा महिला T20 विश्वचषक होती जी बांगलादेशमध्ये 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पुरुषांचा T20 विश्वचषक यावर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून चॅम्पियन बनला होता. या विश्वचषकानंतर, ICC ची पुढील मोठी स्पर्धा महिला T20 विश्वचषक होती जी बांगलादेशमध्ये 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. मात्र, बांगला देशातील सरकारविरोधी निदर्शनांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव T20 विश्वचषकाचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता आहे. महिला T20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या महिला T20 विश्वचषकाच्या यजमानपदाचा दावा झिम्बाब्वेने केला आहे.

आयसीसी भारताबरोबरच श्रीलंका आणि यूएईची पर्याय म्हणून विचार करत आहे, परंतू अजूनही निर्णय झालेला नाही. महिला T20 चा यजमान म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास भारताने नकार दिल्यानंतर झिम्बाब्वे हा यजमानपदासाठी प्रमुख पर्याय म्हणून पुढे आला आहे. याशिवाय यूएईकडेही पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मंगळवारी, 20 ऑगस्ट रोजी आयसीसी बोर्ड याबाबत निर्णय घेऊ शकते. झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनने हा मेगा इव्हेंट (कार्यक्रम) आयोजित करण्याचा प्रस्ताव आयसीसी (ICC) कडे दिला आहे.

दरम्यान, झिम्बाब्वेने शेवटच्या वेळी 2003 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. झिम्बाब्वेचे हरारे आणि बुलवायो येथे सुमारे 10,000 क्षमतेचे दोन स्टेडियम आहेत. झिम्बाब्वेचा महिला संघ T20 विश्वचषकासाठी पात्र ठरलेला नाही आणि हेच त्याच्या आयोजन प्रस्तावाच्या विरोधात जाऊ शकते.

Women T20 World Cup 2024: भारताने नकार दिल्यानंतर 'या' देशात होऊ शकते महिला T20 विश्वचषक स्पर्धा
Neeraj Chopra: नीरज चोप्रा दिसणार लुसाने डायमंड लीगमध्ये खेळताना; अर्शद नदीमच्या 92.97 मी. च्या थ्रोवर केले हे विधान
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com