महिला IPL पुढच्या वर्षीपासून?
खूप दिवसांपासून चाहते महिला IPL व्हावी म्हणून प्रतीक्षा करीत होते. परंतु आता तुमची प्रतीक्षा संपली असून पुढच्या वर्षीपासून महिला IPL सुरू होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले.
महिला IPL चा पहिला सीझन 2023 मध्ये खेळल्या जाणार आहे. यंदा महिला T-20 चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष IPL च्या दरम्यान खेळल्या जाणार आहे. यामध्ये तीन संघांचा समावेश असणार आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे या स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही.
महिला IPL साठी प्रथम वर्षी 5 ते 6 संघ सहभागी होणार असून प्रथम पुरूष IPL च्या सर्व फ्रंचायझींना महिला IPL मध्ये संघ खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले. तसेच सूत्रांच्या आधारे, पुरुष संघाचे 4 फ्रंचायझी महिला IPL संघ खरेदी करण्यास तयार आहेत.
महिला IPL ला प्रथम BCCI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मान्यता द्यावी लागेल, असे IPL गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर गांगुली म्हणाले.