Women's Asia Cup 2024: श्रीलंकेने मारली बाजी! फायनलमध्ये गतविजेत्या टीम इंडियाला केले पराभव
श्रीलंका महिला संघाने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने टीम इंडियावर 8 विकेट्सने मात करत वूमन्स आशिया कप फायनल 2024 ट्रॉफी जिंकली आहे. रविवारी (२८ जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतीय महिला संघाचा ८ विकेट्सने पराभव केला आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
श्रीलंकेची ही आशिया कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. श्रीलंकेसाठी कॅप्टन चमारी अथापथू आणि हर्षिता समरविक्रमा या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. या दोघींच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेला विजय मिळवता आला.
वूमन्स आशिया कप स्पर्धा 2004 पासून खेळवण्यात येत आहे. यंदाची ही 8वी स्पर्धा होती. यापूर्वी भारतीय महिला संघाने 6 वेळा आशिया कप जिंकला आहे, तर बांगलादेशने एकदा आशिया कप उंतावरण्याचा कारनामा केला आहे.