Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषका भारताची विजयी सुरुवात, श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय
आजपासून (1 ऑक्टोबर) महिला आशिया चषकाला बांग्लादेशमध्ये सुरुवात झाली असून भारताने सलामीच्या सामन्या श्रीलंका संघावर विजय मिळवला आहे.बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 2 येथे भारतीय महिलांनी सलामीचा सामना खेळला. या सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंका संघावर 41 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. 1 ऑक्टोबरपासून 15 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार असून भारतीय महिलांचा फॉर्म दमदार असल्याने त्यांच्याकडून सर्वांनाच अपेक्षा आहेत.
श्रीलंका पूर्ण षटके देखील खेळू शकली नाही. सर्वबाद १०९ धावा केल्या. या सामन्यात भारताने जेमीमाह रोड्रिगेझ आणि हरमनप्रीत कौर यांच्या भागीदारीने दीडशतकी धावसंख्या उभारली आहे. जेमीमाहने महत्वाची खेळी केल्याने भारताने २० षटकात सहा गडी गमावत १५० धावा केल्या. तिलाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.