IND vs ENG: जयस्वालला उपांत्य फेरीत संधी मिळेल का? भारताला इंग्लंडकडून बदला घेण्याची संधी
भारताला या सामन्यात रोहित शर्माकडून पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट जोरात गर्जत होती. त्यानी 92 धावांची दमदार खेळी खेळून स्टार्क आणि पॅट कमिन्सचा नाश केला. आगामी सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती. विराट कोहली रोहित शर्माला सपोर्ट करताना दिसणार आहे. मात्र, स्टार फलंदाजचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.
वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेला T-20 विश्वचषक 204 आता शिखराकडे वाटचाल करत आहे. सुपर-8 हे सामने संपले असून आता उपांत्य फेरीचे सामने 27 जून रोजी होणार आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफिक्रा यांच्यात भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता होणार आहे. तर दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात प्रॉव्हिडन्स येथे रात्री 8 वाजता होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.
2022 च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा शेवटच्या उपांत्य फेरीत पराभव झाला होता. जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने चमकदार कामगिरी करत भारताला दणदणीत पराभव दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे इंग्लंडने 16 षटकांत पूर्ण केले. भारतीय संघ सध्याच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे.