गुजरात टायटन्समधून बाहेर पडून हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये का गेला? बायको नताशासोबत निघालं खास कनेक्शन
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविकच्या घटस्फोटाबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्ससोबत जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत ही अपडेट आहे. अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्स संघाला सोडून मुंबई इंडियन्समध्ये जाण्याचा निर्णय घेतला कारण घटस्फोट झाल्यास नताशाला मोठी रक्कम देता येईल. हार्दिक आणि नताशाचं घटस्फोट होईल, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. परंतु, दोघांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीय. पण दररोज खळबळजन खुलासे समोर येत आहेत. हार्दिक पंड्याने दोन हंगामात गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं होतं आणि संघाला चॅम्पियन बनवलं होतं. परंतु, आयपीएल २०२४ आधी हार्दिक मुंबई इंडियन्ससाठी खेळत होता.
नताशासाठी हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये जाण्याचा निर्णय घेतला?
अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, नताशाला पैसे देण्याच्या कारणासाठी हार्दिकने गुजरात टायटन्सला सोडण्याचा निर्णय घेतला होता. मोठी रक्कम मिळावी म्हणून हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. या रिपोर्टबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच सोशल मीडियावर अशाप्रकारची चर्चाही सुरु आहे. जर दोघांमध्ये घटस्फोट झालं, तर हार्दिकची ७० टक्के प्रॉपर्टी त्याची पत्नी नताशाला ट्रान्सफर केली जाईल.
सोशल मीडियाच्या अनेक पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, घटस्फोट झाल्यावर ७० टक्के प्रॉपर्टी नताशाच्या नावावर ट्रान्सफर होईल. रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्याकडे ९१ कोटींची संपत्ती आहे. त्याच्याकडे वडोदरामध्ये ६ हजार स्केअर फूटचा पेंटहाऊस आहे. हा पेंट हाऊस जवळपास ३.६ कोटी रुपयांचा आहे. याशिवाय मुंबईच्या वांद्रे येथे हार्दिकचं एक अपार्टमेंट आहे. हे अपार्टमेंट ३८३८ स्क्वेअर फूटचं आहे. जवळपास ३० कोटी रुपयांचं हे अपार्टमेंट आहे.