रवी शास्त्रीने विराटला का दिला IPL मधून बाहेर पडण्याचा सल्ला...
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या अत्यंत खराब बॅटिंग फॉर्ममधून (Bad Patch) जात आहे. आयपीएलचा हंगाम (IPL 15th Season) सुरू झाला त्यावेळी निदान 30-40 धावा करणारा विराट आता एक एक धाव करण्यासाठी झगडत आहे. विराट कोहलीचा हा खराब फॉर्म पाहून भारताचे माजी प्रशिक्षक आणि विराटचे खंदे समर्थक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीला एक सल्ला (Advice) दिला आहे. रवी शास्त्री यांनी 'मला असे वाटते की विराटसाठी एक ब्रेक खूप महत्वाचा आहे. कारण तो सातत्याने क्रिकेट खेळत आहे त्याने सगळ्या फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याने ब्रेक घेणेच उचित ठरणार आहे.' असे वक्तव्य केले आहे.
विराट कोहली राजस्थान रॉयल्सच्या सामन्यावेळी सलामीला आला होता. मात्र त्याच्या बॅटला बॉलच लागत नव्हता. गेल्या दोन सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला होता. राजस्थान विरूद्ध त्याने 9 धावा केल्या मात्र त्यातील दोन चौकार हे विराटच्या बॅटची एज लागून गेले होते. आरसीबीने हा सामना 29 धावांनी गमावला.
दरम्यान विराट कोहलीच्या या खराब कामगिरीवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'कधी कधी तुम्हाला समतोल साधावा लागतो. तो सध्या आयपीएलच्या हंगामात खेळत आहे तो हा हंगाम रेटण्याचीही प्रयत्न करेल. जर विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट अजून 6 ते 7 वर्षे उत्तम प्रकारे खेळायचे असेल तर आयपीएलमधून बाहेर पडावे लागेल.