कोण होणार आयपीएल २०२१चा विजेता?

कोण होणार आयपीएल २०२१चा विजेता?

Published by :
Published on

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज आयपीएल २०२१ची फायनल होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या खेळात दोन वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांची कसोटी लागणार आहे. चेन्नईची ही नववी फायनल तर केकेआरची तिसरी फायनल आहे.
चेन्नई संघाचे कर्णधार धोनी आणि केकेआर संघाचे कर्णधार इयॉन मॉर्गन या दोघांनी त्याच्या देशांना वर्ल्डकप जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्ये चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली ३ वेळा तर केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली २ वेळा विजेतेपद मिळवले आहे.
आयपीएल १४व्या हंगामात चेन्नईची कामगिरी सर्वात सातत्यापूर्ण झाली आहे. तसेच कोलकाताने पहिल्या सत्रात फक्त २ विजय मिळवले होते. आणि अखेरच्या ७ पैकी ५ त्यानंतर आरसीबी आणि दिल्लीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन्नईला गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही यावेळी त्यांनी सर्वात आधी प्लेऑफ आणि त्यानंतर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. चेन्नईची ही नववी फायनल तर केकेआरची तिसरी फायनल आहे.
अंतिम मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दुबईचे पिच थोडी धिमी आहे. पण ती फलंदाजीसाठी शानदार आहे. या मैदानावरील सरासरी धावसंख्या १५२ इतकी आहे.दरम्यान आयपीएल २०२१चा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com