रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत पाँटिंग कमेंट्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Published on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत पाँटिंग कमेंट्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. वृत्तानुसार, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
एवढा राग आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी...; उदयनराजेंना संताप अनावर

वृत्तांनुसार, कॉमेंट्री करताना रिकी पॉन्टिंगने स्वतःला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले आणि काही लक्षणे जाणवल्यानंतर चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सहकाऱ्यांनी पॉन्टिंगची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे. पाँटिंग आता तिसऱ्या सत्रात समालोचन करणार नाही.

दरम्यान, गेली काही वर्षे ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी कठीण होती. यावर्षी, मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज रॉड मार्श आणि शेन वॉर्न या खेळाडूना गमावले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, आणखी एक ऑस्ट्रेलियन फलंदाज डीन जोन्सचाही हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला होता. याशिवाय, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक आणि अलीकडेच नेदरलँड्सचे प्रशिक्षक रायन कॅम्पबेल यांनाही या वर्षी एप्रिलमध्ये ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
ऋतुराज पुन्हा चमकला, एकाकी झुंज देत जोरदार शतक

रिकी पाँटिंगने आतापर्यंत 168 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले असून 41 शतके आणि 62 अर्धशतकांसह 51.85 च्या सरासरीने 13378 धावा केल्या आहेत. त्याने 375 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42.03 च्या सरासरीने 13,704 धावा केल्या. यात 30 शतके आणि 82 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 17 टी 20 मध्ये 28.64 च्या सरासरीने 401 धावा केल्या आणि दोन अर्धशतके झळकावली. 1999, 2003 आणि 2007 मध्ये सलग तीन 50 षटकांचे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात पॉन्टिंग सहभागी होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com