Virat Kohli-KL Rahul
Virat Kohli-KL Rahulteam lokshahi

Asia Cup Virat Kohli-KL Rahul : विराट कोहली 41 तर केएल राहुल 94 दिवसांनी खेळणार, काही धोका तर नाही ना?

आशिया चषक 27 ऑगस्टपासून होणार आहे
Published by :
Shubham Tate
Published on

Virat Kohli-KL Rahul : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले आहेत. या महिन्यापासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी दोघांची टीम इंडियात निवड झाली आहे. राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशात तो जवळपास सर्व सामने खेळणार हे निश्चित आहे. (virat kohli kl rahul return after long time direct play in india vs pakistan match in asia cup 2022)

व्यवस्थापकांचा अजूनही कोहलीवर पूर्ण विश्वास आहे. आशिया कपच्या जवळपास प्रत्येक सामन्यात त्याला संधी मिळू शकते. आशिया चषक स्पर्धेत भारताला 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

दोघांनाही पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाल्यास राहुलसाठी ९४ दिवसांनी आणि कोहलीसाठी ४१ दिवसांनी सामना होईल. अशात केवळ मोठ्या नावांच्या जोरावर कोणताही सराव सामना किंवा अन्य कोणतीही मालिका न खेळता या सामन्यात या खेळाडूंना मैदानात उतरवणे योग्य ठरेल का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

Virat Kohli-KL Rahul
एनसीबीने 5 कोटींचे अमली पदार्थ केले जप्त, तिघांना अटक

शस्त्रक्रियेनंतर राहुल कोरोना पॉझिटिव्ह आला

यात मोठी गोष्ट म्हणजे कोहलीला गेल्या पाच महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावता आलेले नाही आणि अडीच वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही. तो सातत्याने धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर केएल राहुलची नुकतीच जर्मनीत मांडीवर शस्त्रक्रिया झाली. यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आला. इथे आल्यावर त्याला कोरोना झाला. सध्या तो बरा आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात त्याला थेट मैदानात उतरवणे ही मोठी जोखीम आहे.

केएल राहुलने 25 मे रोजी शेवटचा सामना खेळला होता

KL राहुल या वर्षी 25 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) साठी कर्णधार म्हणून IPL मध्ये शेवटचा सामना खेळला. यामध्ये राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (आरसीबी) ७९ धावांची खेळी खेळली. याआधी झालेल्या सामन्यात राहुलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद ६८ धावांची खेळी केली होती. तो फॉर्मात दिसत होता, पण थेट शस्त्रक्रियेनंतर आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हा योग्य निर्णय वाटत नाही.

कोहली शेवटचा सामना १७ जुलै रोजी खेळला होता

कोहलीने या वर्षी 17 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने केवळ 17 धावा केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर कोहलीने 6 आंतरराष्ट्रीय डावात केवळ 76 धावा केल्या होत्या. त्याने एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 11 आणि दुसऱ्या डावात 20 धावा केल्या.

यानंतर टी-20 मालिकेतील दोन सामन्यांमध्ये त्याला 1 आणि 11 धावाच करता आल्या. यानंतर कोहली एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल असे वाटत होते, पण ही अपेक्षाही फोल ठरली. चाहत्यांच्या अपेक्षा मोडीत काढत त्याने पहिल्या लॉर्ड्स एकदिवसीय सामन्यात 16 धावा केल्या. त्यानंतर मँचेस्टर एकदिवसीय सामन्यात कोहली 17 धावा करून ढेपाळला. आता या वाईट टप्प्यात, दीर्घ विश्रांतीनंतर त्यांना थेट मोठ्या सामन्यात नेणे ही मोठी जोखीम आहे.

Virat Kohli-KL Rahul
IRCTC : तिकीट बुक करताना तुम्हाला फक्त एका क्लिकवर मिळणार 10 लाखांचा लाभ

आशिया चषक 27 ऑगस्टपासून होणार आहे

27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत UAE मध्ये होणाऱ्या आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका, गतविजेते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. पात्रता स्पर्धेनंतर सहावा आणि अंतिम संघ निश्चित केला जाईल. 20 ऑगस्टपासून हाँगकाँग, कुवेत, सिंगापूर आणि यूएईसह सहा संघांच्या पात्रता स्पर्धेला सुरुवात होईल.

आशिया कपसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

हे तिन्ही खेळाडू स्टँडबाय

दुसऱ्या ट्विटमध्ये बीसीसीआयने म्हटले की, 'जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. सध्या ते बंगळुरू येथील एनसीएमध्ये पुनर्वसनात आहेत. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com