Virat Kohli
Virat KohliTeam Lokshahi

Virat Kohli : विराट कोहली 'हा' विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही.
Published on

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. तरीही त्याच्या चाहत्यावर्गावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने स्वत:च्या नावे एक नवा विक्रम केला असून हा विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटचे इंस्टाग्रामवर 20 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. विराट कोहलीचा जगभरात चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे फॉलोअर्स झपाट्याने वाढताना दिसत आहेत.

सध्या विराट कोहली क्रिकेट विश्वात विश्रांती घेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (ind vs sa) पुढील टी 20 मालिकेमध्ये विराट खेळणार नसून सध्या विराटने ब्रेक घेतला आहे.

Virat Kohli
Virat Kohli ; विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदाचा दिला राजीनामा, ट्विटरवर काय म्हणाला विराट?

इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) पहिल्या स्थानावर असून त्याचे 451 दशलक्ष (45.1कोटी) फॉलोअर्स आहेत. त्यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे 334 दशलक्ष (33.4 कोटी) येवढे फॉलोअर्स आहेत. विराट कोहली हा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतोचं त्याचप्रमाणे त्याला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी देखील पाच कोटी रुपये मिळतात अशी चर्चा आहे.

Virat Kohli
Virat Kohli चा खराब फॉर्म;निवड समिती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com