विराट कोहली आणि गौतम गंभीर पुन्हा भिडले; दोघांना 'ही' मिळाली भांडणाची शिक्षा
लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली.
आरसीबीने पहिले बॅटिंग करताना अवघ्या 126 धावाच केल्या. त्यामुळे लखनऊला 127 धावांचं आव्हान मिळालं. लखनऊने तेव्हा 1 विकेटने आरसीबीवर विजय मिळवला होता. हस्तांदोलन करताना एकमेकांनी दोघांचे हात झटकले. लखनऊच्या नवीन उल हक आणि विराट या दोघांमध्ये वाद झाला. गंभीर त्याठिकाणी आला. शेवटी विराट आणि गंभीर भिडले. विराटच्या बाजूने पूर्ण आरसीबीची टीम, गंभीरच्या पाठीशी लखनऊची टीम. मधोमध अमित मिश्रा उभा होता. मात्र दोघांमध्ये खटके उडण्याआधी मिश्राने मध्यस्थी केली. या वादाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्रिकेटच्या नियमांच्या विरोधात असून विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघांना त्याची शिक्षा मिळाली आहे. दोघांना आचार संहिता उल्लंघनात दोषी ठरवले आहे. शिक्षा म्हणून त्यांची मॅच फी कापण्यात आली आहे.शिक्षा म्हणून त्यांची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली.
विराट कोहली : 1.07 कोटी (100 टक्के मॅच फी).
गौतम गंभीर : 25 लाख (100 टक्के मॅच फी).
नवीन-उल-हक : 1.79 लाख (50 टक्के मॅच फी).