Tokyo Olympics | ब्रॉन्झ मेडल जिंकण्याचं भारतीय महिला हॉकी टीमचं स्वप्न हुकलं

Tokyo Olympics | ब्रॉन्झ मेडल जिंकण्याचं भारतीय महिला हॉकी टीमचं स्वप्न हुकलं

Published by :
Published on

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं आहे. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ब्रिटन संघाने 4-3 ने पराभूत केलं. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीमचा 3-4 ने पराभव झाला. ब्रॉन्झ मेडलच्या मॅचसाठी भारताचा सामना ग्रेट ब्रिटनशी होता. पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटननं जोरदार सुरुवात केली. मात्र भारताची गोल किपर सविता पुनियानं तितकाच जोरदार खेळ केला.

भारतानं दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर करत बरोबरी साधली. त्यानंतर वंदना कटारियानं गोल करत भारताला 3-2 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले. यामध्ये ब्रिटननं 2 तर भारतानं 3 गोल केले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाच मिनिटांनी ब्रिटनची कॅप्टन होली वेबनं गोल करत ब्रिटनला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ब्रिटननं वर्चस्व होतं. त्यानी गोलपोस्टवर जोरदार हल्ला केला. मात्र गोल किपर सविता पुनियानं भक्कम बचाव करत गोल वाचवले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com