Tokyo Olympics | पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक
भारतीय शटलर आणि जागतिक मानांकनात सहाव्या स्थानावर असलेली पीव्ही सिंधू टोक्यो ऑलिंपिक्समध्ये पदकाच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्वी फेरीत आपला प्रवेश निश्चित केला.
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत १२ व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा ४० मिनिटांमध्ये २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे आता सिंधू पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे. या विजयामुळे सिंधूची मियाविरुद्धची आतापर्यंतच्या सामन्यांमधील सिंधूची कामगिरी ५-१ अशी झालीय. म्हणजेच या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूने जिंकलेत.
कालच्या विजयाने बाद फेरीत प्रवेश केलेल्या सिंधूने आजच्या सकाळी आपला पहिलाच सामना जिंकत पदकाच्या दिशेने आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. तिने जागतिक मानांकनात 13 व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड वर 21-15, 21-13 अशी मात करत बाद फेरीतही आपली विजयी वाटचाल कायम ठेवली आहे.
या सामन्यात पराभूत झालेली खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडणार होती. आपल्या पहिल्या बाद फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डशी खेळताना पहिल्या गेममध्ये सिंधूने 4-1 अशी आघाडी घेतली होती.
सिंधुने पहिला गेम 21-15 ने जिंकला. सिंधुने यामध्ये ड्रॉप शॉट्स आणि स्मॅशेसच्या बळावर पॉंईट्स मिळवले. 22 मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये ती खूपच कंट्रोलमध्ये दिसली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ब्लिचफेल्डला प्रतिकाराची फारशी संधीच दिली नाही. सिंधूने हा गेमही 21-13 असा जिंकत 41 मिनिटांच्या सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले.