RR  Vs. RCB
RR Vs. RCBTeam Lokshahi

IPL 2022: आज राजस्थान विरूद्ध बंगळुरू सामना

Published by :
Vikrant Shinde
Published on

आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) अशी लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2022) हे दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आजची लढत ही चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात बंगळुरुचा संघ दोनपैकी एक सामना जिंकला आहे तर, राजस्थानचा संघ दोन्ही सामने जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ सध्या गुणमालिकेत अव्वल स्थानावर आहे.

आतापर्यंतचे RR vs RCB सामन्यांचे निकाल:

आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यात 24 सामने झाले आहेत. यामध्ये आरसीबी संघाचं पारडं काहीसं जड आहे. कारण 24 मधील 12 सामने त्यांनी जिंकले असून 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत आजवर पाहायला मिळाल्याने आजचा सामनाही चुरशीचा होणार यात शंका नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com