Tokyo 2020 । टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी ‘या’ स्पर्धा होणार
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी उद्याचा म्हणजेच 31 जुलैचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारत तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, निशानेबाजी, सेलिंग अशा खेळांमध्ये भाग घेणार आहे. यामध्ये बॅडमिंटन, तिरंदाजी आणि निशानेबाजी या खेळांमध्ये भारताल पदक मिळण्याच्या सर्वाधिक आशा आहेत.
टोक्यो ओलिम्पिक ही मानाची स्पर्धा आता मध्यांतरावर पोहचली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत टोक्यो ओलिम्पिकमध्ये 2 पदकांवर नाव कोरलं आहे. भारतीय खेळाडूंनी काही खेळात केलेल्या अप्रतिम खेळांमुळे आणखी पदकं मिळण्याची शक्यता आहे. या सर्वामध्ये बॅडमिंटन, तिरंदाजी आणि निशानेबाजी या खेळांमध्ये भारताल पदक मिळण्याच्या सर्वाधिक आशा आहेत.
अतनु दास आणि सिंधूवर सर्वांची नजर
पुरुष तिरंदाजीमध्ये भारताचा अतानु दास पुरुष एकेरीमध्ये प्री क्वॉर्टरचा सामना खेळतील. यावेळी त्याचा सामना जपानच्या तिरंदाजाशी होईल. पुरुष एकेरीसह भारतीय तिरंदाज टीम इवेंटमध्ये सहभाग घेणार आहेत. महिलांमध्ये बॅडमिंटन एकेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधू सेमीफायनलचा सामना खेळेल. तसेच निशानेबाजीमध्ये अंजुम मौदगिल आणि तेजस्विनी सावंत सहभाग घेणार आहेत. तर बॉक्सिंगमध्ये बॉक्सर अमित पंघाल सामना खेळताना दिसेल.
महिला हॉकी संघाला विजय अनिवार्य
भारतीय महिला हॉकी संघाला 31 जुलैचा दिवस महत्त्वाचा आहे. उपांत्य पूर्व फेरीत पोहोचण्यासाठी शनिवारचा दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा सामना खेळणं महत्त्वाचं आहे. भारताला विजयासह आयर्लंड संघाला त्यांचा ग्रुपमधील सामना पराभूत होणंही भारतासाठी पुढील फेरीत पोहचण्यासाठी महत्त्वाचं आहे.