गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विश्वविक्रम, गिनिज बुकमध्ये नोंद

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विश्वविक्रम, गिनिज बुकमध्ये नोंद

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विश्वविक्रम होऊन गिनिज बुकमध्ये त्याची नोंद झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विश्वविक्रम होऊन गिनिज बुकमध्ये त्याची नोंद झाली आहे. 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने विश्वविक्रम केलाय. हा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. याची माहिती बीसीसीआय आणि जय शाह यांनी ट्विट करत दिली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम आहे. अहमदाबाद येथे असलेले नरेंद्र मोदी स्टेडियमला आधी गुजरात क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या नावानं ओळखलं जातं. मोटेरा येथे असलेल्या या स्टेडियममध्ये 1 लाख 10 हजार दर्शक बसण्याची क्षमता आहे

29 मे रोजी गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये अहमदाबाद स्टेडिअममध्ये फायनल सामना झाला होता. या सामन्यात गुजरातने सात विकेट्सनं बाजी मारली होती. आयपीएल फायनल सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी विश्वविक्रम केलाय. यासाठी याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. हे जगातील एकमेव क्रिकेट स्टेडिअम आहे, जिथे टी २० सामना पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली.

'आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारताने आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंदवलं आहे. चाहत्यांचं समर्थानामुळे हे शक्य झालं.' बीसीसीआयच्या या ट्विटला सेक्रेटरी जय शाहने रिट्विट करत म्हटले की, २९ मे रोजी आयपीएलच्या अंतिम सामन्याला 101566 चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली आहे. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सर्व चाहत्यांचं आभार...असे बीसीसीआयने ट्वीट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com