Virat Kohli चा खराब फॉर्म;निवड समिती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. बीसीसीआयचे (BCCI) वरिष्ठ अधिकारी विराट कोहलीच्या खराब फार्ममुळे चिंतेत आहेत. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून, निवड समिती मोठा निर्णय घेणार असल्याचे समजते आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विराट कोहली हा भारताच्या महान खेळाडूपैकी एक आहे. यावेळी निवड समितीने विराट कोहली (Virat Kohli) आणि अन्य खेळाडूंसाठीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही निर्णय त्यांना सांगत नाही. तर विराट कोहली स्वत:च्या फॉर्ममुळे चिंतेत आहे. त्यामुळे निवड समितीच विराट कोहलीबाबतचा निर्णय घेणार आहे. विराट कोहलीचा फॉर्म बघता निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. असे अधिकारी म्हणाले.
विराट कोहलीला रनमशीनही म्हटल जाते. धावांचा पाठलाग करणारा विराट कोहलीसारखा दुसरा कोणता फलंदाज नाही. पण मात्र काही दिवसांपासून विराटची बॅट शांत दिसत आहे. 23 नोव्हेंबर 2019ला विराटच्या बॅटमधून अखेरचा शतक लागला होता. त्यानंतर विराटच्या बॅटमधून एकही शतक लागला नाही. तसेच आयपीएलमध्येही (IPL) विराटची बॅट शांत दिसत आहे.
भारतामध्ये सध्या आयपीएल 15चे हंगाम चालू आहे. 29 मेला हे हंगाम संपणार आहे. आयपीएल संपल्यावर लगेच दहा दिवसानंतर भारत आणि दक्षिण (India vs South Africa) आफ्रिकामध्ये टी 20 मालिका एकमेकांशी भिडणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये 9 जूनपासून सुरू होणार असून टी 20चे पाच सामने होणार आहेत.