Heath Streak : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकच्या निधनाचं वृत्त चुकीचं
झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक यांचं वयाच्या 49 व्या वर्षी कॅन्सरनं निधन झाल्याची बातमी पसरली होती. स्ट्रीकचं निधन झालं नसून तो हयात असल्याचा दावा स्ट्रीकचा सहकारी आणि एका माजी क्रिकेटरनं केला आहे. हेन्री ओलांगा यांनी सर्वात आधी ट्वीट करून हीथ स्ट्रीकचं निधन झाल्याचं म्हटलं होतं.
आता हेन्री ओलांगा यांनी पहिलं ट्विट डिलीट करत नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्ट्रीक हयात असून त्याच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. हीथ स्ट्रीकच्या निधनाची बातमी खूप लवकर पसरली. मी आताच त्याच्याशी बोललो. थर्ड अंपायरनं त्याला परत बोलावलंय. तो हयात आहे. असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.
माजी क्रिकेटर हेन्री ओलांगा यानं स्ट्रीकसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला असून त्याच्या निधनाचं वृत्त फेटाळून लावलं आहे.