IND vs ENG : कोण मारणार बाजी? आजपासून भारत आणि इंग्लंडच्या अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात
भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून अखेरचा कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा धर्मशालेत खेळवण्यात येणार आहे. हा सामना 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता टीम इंडिया विजयी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विशाखापट्टणम कसोटीत भारताने 106 धावांनी विजय मिळवला. राजकोट कसोटी सामन्यात 434 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर रांची कसोटीत पाच विकेटने मात केली. आता अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी साहेब मैदानात उतरली.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं आहे. बुमराहला चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. तर वॉशिंग्टन सुंदर याला रणजी ट्रॉफी सेमी फायनलसाठी रिलीज करण्यात आलं. त्यामुळे प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. तर आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर फिरकीची धुरा असेल. कुलदीप यादव अथवा अक्षर पटेल यांच्यापैकी एका गोलंदाजाला संधी मिळू शकते. फलंदाजीमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात फक्त एका वेगवान गोलंदाजासह उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण दोन सामन्यानंतर इंग्लंडने रणनिती बदलली. आता इंग्लंड संघ दोन वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरत आहे.
इंग्लंडची प्लेईंग 11-
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर
भारताची संभाव्य 11 -
यशस्वी जायस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पड्डीकल, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, कुलदीप यादव/अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज