IND vs ENG : १०० व्या कसोटीत अश्विन रचणार इतिहास, दिग्गज कुंबळेचा विक्रम मोडणार? क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करुन इंग्लंड विरुद्ध सुर असलेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खिशात घातली आहे. भारताने ३-१ ने आघाडी घेतली असून अखेरचा सामना गुरुवारी ७ तारखेला धरमशाला येथे रंगणार आहे. धरमशाला येथे भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनस धरमशाला येथे १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात त्याला भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्यामुळे तमाम क्रिकेटप्रेमींची हा सामना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रविचंद्रन अश्विन धरमशाला येथे कुंबळेचा विक्रम मोडू शकतो. धरमशाला मैदानात अश्विन १०० वा कसोटी सामना खेळणार असून राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात त्याने ५०० विकेट्स घेत इतिहास रचला. अनिल कुंबळेच्या नावावर ३५ वेळा एका डावात ५ विकेट घेण्याचा विक्रम आहे. दरम्यान, या सामन्यात अश्विनला या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात अश्विनने पुन्हा एकदा पाच विकेट घेतल्या, तर कुंबळेचा विक्रम मोडला जाऊ शकतो.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा ५ विकेट घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुथैया मुरलीधरन (६७), शेन वार्न (३७) रिचर्ड हार्डली (३६) यांचा समावेश आहे. हा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान गाठण्यावर भारताची नजर असणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने या मालिकेत ३-१ ने आघाडी घेत मालिका विजयाची मोहोर उमटवली आहे.