Team India T20 World Cup: विश्वचषकात भारत का करतोय पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना? जाणून घ्या...
महिला टी 20 वर्ल्ड कपच्या झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाच्या अ गटात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात भारताचा 9 धावांनी पराभव झाला आहे. त्यामुळे भारताच्या टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यता कमी झालेल्या पाहायला मिळत आहेत. मात्र भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या अपेक्षा पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयावर अवलंबून आहेत. पाकिस्तानचा विजय हा भारतासाठी उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग ठरणार आहे. भारताचा नेट रन रेट जास्त असल्यामुळे जर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय पटकावला तर भारताला टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला 152 धावांचं आव्हान देण्यात आलेलं होत. भारताच्या 47 धावांमध्ये 3 विकेट गेल्या होत्या त्यामुळे भारताचे आक्रमक फलंदाज स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर तसेच दिप्ती शर्मा यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. हरमनप्रीत कौरने 54 धावा केल्या तर दिप्ती शर्माने 63 धावांची कामगिरी केली मात्र भारताला अपयश मिळाले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 8 गुण आणि 2.22 नेट रन रेटसह पहिलं स्थान पटकावलं तर भारत हा 4 गुण आणि 0.322 नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच न्यूझीलंड 4 गुण आणि 0.282 नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान 2 गुण आणि 0. 488 नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे अशा प्रकारचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 53 धावांपेक्षा अधिक धावांनी विजय मिळवल्यास अथवा 9.1 ओव्हरमध्येच त्यांनी धावा पूर्ण करुन विजय मिळवल्यास नेट रनरेट ते भारतापेक्षा पुढे जातील आणि पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळेल.