IND vs SL: पहिल्या T-20 मध्ये टीम इंडियाची विजयाने सुरुवात! इंडियाचा श्रीलेंकेवर 43 धावांनी विजय
सूर्यकुमार आणि आघाडीच्या फलंदाजांच्या बळावर भारताने सात गडी गमावून 213 धावांची मोठी मजल मारली. एके काळी श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर 140 धावा होती आणि पुढच्या 30 धावा करताना श्रीलंकेने उरलेल्या नऊ विकेट गमावल्या.
कर्णधार सूर्यकुमार यादव (58) याच्या आक्रमक अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघाने शनिवारी येथे पहिल्या T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार आणि आघाडीच्या फलंदाजांच्या बळावर भारताने सात गडी गमावून 213 धावांची मोठी मजल मारली. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला आघाडीच्या फळीकडून चांगली सुरुवात झाली, मात्र असे असतानाही संघ 19.2 षटकांत 170 धावांवरच मर्यादित राहिला. संघासाठी सलामीवीर पथुम निसांकाने 48 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांचे अर्धशतक झळकावले.
श्रीलंकेचे बॅट्समन चांगली फटकेबाजी करत होते आणि ही मॅच श्रीलंका जिंकण्याची शक्यता दिसत होती. मात्र, अक्षर पटेलने एका ओव्हरमध्येच गेम फिरवला आणि मॅचचं चित्रच बदललं. टीम इंडियाकडून रियान पराग याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. रियान परागने तीन विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
यशस्वी आऊट झाल्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि अक्षरश: रन्सचा पाऊस पाडला. सूर्यकुमार यादवने 22 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. 8 फोर आणि दोन सिक्स याच्या मदतीने सूर्यकुमारने 26 बॉल्समध्ये 58 रन्सची इनिंग खेळली. त्याला पथिराना याने एलबीडब्ल्यू आऊट केलं. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वालने 40 रन्स, शुभमन गिलने 34 रन्स, सूर्यकुमार यादवने 58 रन्स, ऋषभ पंतने 49 रन्स, हार्दिक पांड्याने 9, रियान परागने 7 रन्स, रिंकु सिंहने एक रन तर अक्षर पटेलने नॉट आऊट 10 रन्स आणि अर्शदीप सिंग याने नॉट आऊट एक रन केला.