IND vs PAK: भारतीय चाहत्यांचं वाढलं टेन्शन; कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत, खेळपट्टीबाबत BCCI नं केली तक्रार
Rohit Sharma Injured During Practice Session : टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये टीम इंडिया त्यांचा दुसरा सामना पाकिस्तानविरोधात खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये ९ जूनला महामुकाबला रंगणार आहे. तत्पूर्वी, भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढलं आहे. रिपोर्टनुसार, कर्णधार रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाली. त्यानंतर भारतीय नियामक मंडळाने खेळपट्टीबाबत तक्रार नोंदवली आहे. बीसीसीआय न्यूयॉर्क खेळपट्टीबाबत खूश नसल्याचं बोललं जात आहे.
भारतीय संघाने आर्यलँड विरोधात पहिला सामना खेळला होता, त्यावेळी रोहित शर्माला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं होतं. रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यामुळे अर्धशतकी खेळी केल्यानंतर रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर गेला होता. टीम इंडिया तो सामना सहजपणे जिंकणार होता, त्यामुळे रोहितला रिस्क घेणं योग्य वाटलं नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. रेव्हस्पोर्ट्स (RevSportz) च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान विरोधात होणाऱ्या सामन्याआधी रोहितला दुखापत झाली आहे. थ्रो डाऊन स्पेशलिस्टने फेकलेला चेंडू त्याच्या हातावर लागला. याबाबात बीसीसीआयने अद्यापही कोणतीही अपडेट दिली नाही. जर रोहित शर्मा पाकिस्तानविरोधात होणाऱ्या सामन्यातून बाहेर झाला, तर टीम इंडियाला मोठा धक्का बसेल. रोहित शर्माच्या अनुपस्थीत हार्दिक पंड्या टीम इंडियाचं नेतृत्व करेल. रोहित शर्मा पूर्णपणे फिट आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाहीय, अशीही माहिती समोर येत आहे.