Rohit Sharma Latest News
Rohit Sharma Lokshahi

Rohit Sharma: "तुम्ही मला..."; रोहित शर्मानं सांगितला वनडे आणि टेस्टच्या निवृत्तीचा संपूर्ण प्लॅन

भारताला टी-२० वर्ल्डकपचा किताब जिंकवून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्मानं त्याच्या भविष्यातील प्लॅनबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Rohit Sharma On His Retirement Plans: भारताला टी-२० वर्ल्डकपचा किताब जिंकवून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्मानं त्याच्या भविष्यातील प्लॅनबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. टी-२० वर्ल्डकपचा किताब जिंकल्यानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. वनडे आणि टेस्ट क्रिकेटसाठी रोहितचा प्लॅन काय आहे? असा सवाल अनेक चाहत्यांना पडला आहे. यूएसएमध्ये क्रिकेट अकॅडमीच्या शुभारंभावेळी रोहितनं त्याच्या भविष्यातील कारकिर्दीबाबत मोठं विधान केलं. माझ्या भविष्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही. मी पुढच्या गोष्टींचा विचार करत नाही. त्यामुळे तुम्ही मला काही काळापर्यंत खेळताना नक्की पाहाल.

रोहितने भारताला जिंकवून दिला टी-२० वर्ल्डकप

रोहित शर्माने टीम इंडियाचं नेतृत्व करून भारताला टी-२० वर्ल्डकपचा किताब जिंकवून दिला आहे. भारताने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद जिंकलं. रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय किकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. टी-२० मध्ये विश्वविक्रम केल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रोहितनं निवृत्ती घेतली. रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ४२३१ धावा केल्या आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित करणार कॅप्टन्सी

२०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. पाकिस्तानमध्ये आगामी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असल्याचं बीसीसीआय सचिव जय शहांनी नुकतच जाहीर केलंय. तसच टेस्टसाठीही रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. रोहित भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्समध्येही ट्रॉफी जिंकवून देईल, अशी आशा चाहत्यांना लागली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com