Rohit Sharma
Rohit Sharma

IND vs ENG : शतक ठोकून रोहित शर्माने रचला इतिहास, वॉर्नरसह 'या' दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे

रोहित शर्माने शतक ठोकून मोठा कारनामा करत 'या' दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं.
Published by :
Team Lokshahi
Published on

कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ८ विकेट्स गमावून ४७३ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडने पहिल्या दिवशी सर्वबाद २१८ धावा केल्या. रोहितने १०३ आणि शुबमनने ११० धावांची शतकी खेळी केली. रोहितने कसोटी क्रिकेटमधील १२ वे शतक पूर्ण केले. या कसोटीतील रोहितचे हे दुसरे शतक आहे.

धरमशाला येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात रोहितने शतक ठोकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात नोंद केलीय. डब्ल्यूटीसीच्या इतिहासात सर्वात जास्त शतक ठोकण्याचा कारनामा रोहितने केला आहे. रोहित भारताचा एकमेव फलंदाज आहे, ज्याने WTC मध्ये सर्वात जास्त ९ शतक ठोकले आहेत. रोहितशिवाय कोणत्याही भारतीय फलंदाजाने इतके शतक ठोकले नाहीयत.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटीच्या १२ व्या शतकाच्या जोरावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात मोहोर उमटवली. सलामीचा फलंदाज म्हणून २०१९ पासून आतापर्यंत सर्वात जास्त शतक ठोकण्याच्या शर्यतीत उस्मान ख्वाजा (५ शतक), टॉम लेथम (५ शतक), डेविड वॉर्नर (५ शतक), करुणारत्ने (८ शतक) या खेळाडूंना मागे टाकलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com