टीम इंडियाच्या ६ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

टीम इंडियाच्या ६ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

Published by :
Published on

भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कप्तान यश धुलसह सहा क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे.

अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघ आपला दुसरा सामना खेळत आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात या सहा क्रिकेटपटूंना खेळवण्यात आले नाही. या सामन्यात निशांत सिद्धू संघाचा कर्णधार आहे. संघातील सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे सामन्यादरम्यान प्रशिक्षकांनाचा खेळाडूंसाठी मैदानावर पाणी घेऊन जावे लागत आहे. यश धुल आणि उपकर्णधार राशिद यांच्या व्यतिरिक्त मानव प्रकाश, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि वासू वत्स क्वारंटाइन आहेत. त्यामुळे संघाची अवस्था बिकट आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी १७ खेळाडूंचा संघात समावेश करण्याची परवानगी दिली होती.

काही खेळाडू पॉझिटिव्ह खेळाडूंच्या संपर्कात आल्याचे एका सूत्राने सांगितले. या कारणास्तव, खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुढील मोठ्या सामन्यापूर्वी संघाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही. पहिल्या सामन्यात या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने चार वेळा अंडर-१९ वर्ल्डकप जिंकला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com