भारताने रचला इचिहास! रिलेच्या अंतिम फेरीत पोहोचला पुरुष संघ

भारताने रचला इचिहास! रिलेच्या अंतिम फेरीत पोहोचला पुरुष संघ

हंगेरीतील बुडापेस्ट येथे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरु आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Published on

नवी दिल्ली : हंगेरीतील बुडापेस्ट येथे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरु आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या चॅम्पियनशिपच्या 4x400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

मुहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे यश मिळविले आहे. भारतीय पुरुष संघाने ४x४०० मीटर रिले शर्यतीत २:५९.०५ अशी वेळ नोंदवून आशियाई विक्रम मोडला आहे. यापूर्वीचा विक्रम जपानच्या (2 मिनिटे 59.51 सेकंद) खेळाडूंच्या नावावर होता. भारतीय संघाने अमेरिकेनंतर दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अमेरिकन खेळाडूंनी ही शर्यत दोन मिनिटे 58.47 सेकंदात पूर्ण केली.

पहिल्या धावेनंतर सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुहम्मद अनास याहियाने भारताची सुरुवात केली. यानंतर अमोज जेकबच्या शानदार धावाने भारताला दुसऱ्या स्थानावर नेले. त्यानंतर महंमद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांनी ती आघाडी कायम राखली. राजेशने क्षणार्धात अमेरिकेच्या जस्टिन रॉबिन्सनला अँकर लेगमध्ये हरवले.

दरम्यान, जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकता आली होती. यावेळी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या झोळीत काही पदके येऊ शकतात. आज नीरज चोप्रा, डीपी मनू आणि किशोर जेना पुरुष भालाफेकच्या अंतिम फेरीत आपले खेळ सादर करतील. आणि भारतीय संघ ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत भाग घेईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com