Team India In Mumbai : भारतात टीम इंडियाचं जंगी स्वागत; विमानतळावर केक कापत केलं सेलिब्रेशन

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने विश्वचषक ट्ऱॉफी पटकावली यादरम्यान टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
Published by :
Team Lokshahi

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने विश्वचषक ट्रॉफी पटकावली. यादरम्यान टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. टीम इंडिया भारतामध्ये आल्यानंतर एक वेगाळाच जोश चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यांचे सेलिब्रेशन केल जातं आहे. बार्बाडोसमध्ये अडकल्यामुळे भारतीय संघाला आपल्या देशात येणं शक्य झाले नाही, मात्र आज रोहित शर्मा आणि भारतीय संघातील खेळाडूंचे आगमन भारतात झाले आहे.

त्या दरम्यान सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चाहते टीम इंडियाच्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. तर टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत जय शाहा जे BCCI चे अध्यक्ष ते ही टीम इंडियासोबत पाहायला दिसत आहेत. हॉटेल आयटीसी येथे भारतीय संघातील खेळाडूंचे स्वागत करून भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड जे भारतीय संघाचे कोच आहेत यांच्या हस्ते केक कापण्यात आला आहे.

मात्र या सगळ्यात रोहित शर्माच्या चेहऱ्यावर थकावा दिसून येत आहे. 15 तासांचा प्रवास करून टीम इंडियाचे खेळाडू मायदेशात परतले आहेत. एक थकावट त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला आहे. तर केक कटिंग करून टीम इंडिया पंतप्रधान मोदींच्या भेटीला रवाना झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com