क्रीडा
श्रीलंकेचा संघ 50 धावांवर ऑलआउट; सिराज ठरला सुपरस्टार
आशिया कप 2023 चा अंतिम सामना आज भारतीय आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा जलवा दिसला आहे.
कोलंबो : आशिया कप 2023 चा अंतिम सामना आज भारतीय आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा जलवा दिसला आहे. सिराजने अवघ्या एका षटकात चार विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. श्रीलंकेचा 50 धावांतच सर्वबाद झाला आहे.
टीम इंडियाने श्रीलंकेला 50 रन्सवर ऑल आऊट केले. मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. सिराजनेही मेडन ओव्हर टाकले. हार्दिक पांड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. हेमंताने 13 धावा केल्या. 15 ओव्हरमध्ये श्रीलंकेने 50 धावाचं करता आल्या. यामुळे भारताच्या विजयाच्या मार्ग सोप्पा झाला आहे.