T20 WC कोहलीचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगलं, अफगाणिस्तानच्या पराभवासह हिंदुस्थान स्पर्धेबाहेर

T20 WC कोहलीचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगलं, अफगाणिस्तानच्या पराभवासह हिंदुस्थान स्पर्धेबाहेर

Published by :
Published on

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं आहे. न्यूझीलंडने अफगणिस्तानचा 8 विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. अफगणिस्तानने दिलेलं 125 रनचं आव्हान 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. केन विलियसमन 40 रनवर आणि डेवॉन कॉनवे 36 रनवर नाबाद राहिले. अफगणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेटने मिळाली.

या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच मॅचवर पकड बनवली. 19 रनवरच अफगणिस्तानच्या तीन विकेट गेल्या होत्या, पण नजीबुल्लाहने गुलाबदिन आणि मोहम्मद नबीच्या साथीने अफगणिस्तानचा डाव सावरला. नजीबुल्लाहने 48 बॉलमध्ये 73 रन केले. नजीबुल्लाहच्या या खेळीमुळे अफगणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 विकट गमावून 124 रन करता आले. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर टीम साऊदीला 2 विकेट मिळाल्या. एडम मिल्ने, जेम्स नीशम आणि ईश सोढीला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

सेमी फायनलच्या चारही टीम ठरल्या

या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला असता आणि सोमवारी भारताने नामिबियाचा पराभव केला असता तर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली असती. पण आता न्यूझीलंडचा विजय झाल्यामुळे टीम इंडियाचं आव्हान सुपर-12 मध्येच संपुष्टात आलं आहे. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तान आणि न्यूझीलंड सेमी फायनलला पोहोचले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com