MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव
आयपीएल 2024चा 55वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहणार आहे तर हैदराबादला आपले स्थान मजबूत करायचे आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत आठ गडी गमावून 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सूर्या आणि टिळक यांच्या 100+ धावांच्या भागीदारीमुळे मुंबईने सामना सात गडी राखून जिंकला.
सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला. एमआयच्या या विजयात टिळक वर्मा यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. दोघांमध्ये 143 धावांची नाबाद भागीदारी झाली. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचे गोलंदाज संघर्ष करताना दिसले. मुंबईच्या फलंदाजांनी त्याला पराभूत केले.
दरम्यान त्याआधी मुंबईने टॉस जिंकून कॅप्टन हार्दिक पंड्या याने हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 173 धावा केल्या. हैदराबादसाठी ओपनर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. तर अखेरीस कॅप्टन पॅट कमिन्स याने 17 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 35 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि पीयूष चावला या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघाची प्लेइंग 11:
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11 :
पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 :
हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.