Team India Playing XI
Suryakumar Yadav google

IND vs SL: तिसऱ्या टी-२० साठी कर्णधार सूर्यकुमार यादव करणार तीन मोठे बदल? संजू सॅमसन होणार बाहेर

या मालिकेतील शेवटचा तिसरा टी-२० सामना उद्या मंगळवारी ३० जुलैला पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Three big changes in Team India Playing xi : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून भारतानं सलग दोन सामन्यांत विजय संपादन केला आहे. त्यामुळे २-१ नं आघाडी घेत भारतानां श्रीलंके विरुद्ध सुरु असलेली टी-२० मालिका खिशात घातली आहे. दरम्यान, या मालिकेतील शेवटचा तिसरा टी-२० सामना उद्या मंगळवारी ३० जुलैला पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं विजयी पताका फडकावली आहे. अशातच उद्या होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव तीन मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

अर्शदीप सिंगच्या जागेवर खलील अहमद

श्रीलंके विरोधात झालेल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये अर्शदीप सिंगने प्लेईंग ११ मध्ये जागा पक्की केली होती. त्यामुळे खलील अहमद संघातून बाहेर होता. अशातच तिसऱ्या टी-२० सामन्यात अर्शदीपच्या जागेवर खलील अहमदला संधी मिळण्याची शक्यता आहे. खलीलचं झिम्बाब्वे विरोधात झालेल्या मालिकेत पुनरागमन झालं होतं. परंतु, अर्शदीपचा संघात समावेश केल्यानं खलीलला बाहेर बसावं लागलं होतं. खलील २ ऑगस्टला सुरु होणाऱ्या वनडे मालिकेच्या स्क्वॉडमध्येही आहे. अशातच खलीलला गेम टाईम देण्यासाठी सूर्यकुमार तिसऱ्या टी-२० मध्ये अर्शदीपच्या जागेवर खलीलला संधी देऊ शकतो.

अक्षर पटेलच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर

अक्षर पटेललाही आराम दिलं जाऊ शकतं. अक्षरने पहिले दोन्ही सामने खेळले आहेत. त्याच्या जागेवर वॉशिग्टंन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. सुंदरने झिम्बाब्वे विरोधात झालेल्या मालिकेत प्लेयर ऑफ द सीरिजचा किताब जिंकला होता. वनडे स्क्वॉडमध्येही वॉशिंग्टनचं पुनरागमन झालं आहे. अशातच वडने मालिकेपूर्वी अक्षरला विश्रांती देऊन सुंदरला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

संजू सॅमसनच्या जागेवर शुबमन गिल

दुसऱ्या टी-२० सामन्यात शुबमन गिल अनफिट असल्यानं संजू सॅमसनला संधी मिळाली होती. परंतु, संजूला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे संजू तिसरा टी-२० सामना खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. संजूच्या जागेवर शुबमनची वापसी होऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com