RR Vs SRH | सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आजच्या दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये पहिला सामना रंगणार आहेत. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा नवीन कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजीस उतरेल. दरम्यान सनरायजर्स हैदराबादच्या बदललेल्या नेतृत्वाने तरी संघाला यश मिळेल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि विल्यम्सन या चौघांवर हैदराबादच्या फलंदाजीची मदार आहे. गोलंदाजीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानने प्रतिस्पध्र्यावर अंकुश ठेवताना सहा सामन्यांत ९ बळी घेतले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार झगडत असून, दुखापतीमुळे दोन सामन्यांना मुकला आहे.राजस्थानची फलंदाजी कर्णधार संजू सॅमसनवर मोठय़ा प्रमाणात विसंबून आहे. परंतु त्याच्या फलंदाजीत मोठय़ा प्रमाणात सातत्याचा अभाव जाणवला. सलामीवीर जोस बटलर सामन्यांपैकी एकदाही अर्धशतक नोंदवता आलेले नाही. मधल्या फळीतील डेव्हिड मिलरने एकमेव अर्धशतक साकारले आहे. रयान पराग धावांसाठी झगडत आहे. गोलंदाजीत ख्रिस मॉरिसने सहा सामन्यांत ११ बळी घेत छाप पाडली आहे.
दरम्यान राजस्थानने सहा सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने सहा सामन्यांपैकी एक विजय मिळवला आहे. पण आयपीएल गुणतालिकेत हे संघ सध्या अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.