श्रीलंकेने टॉस जिंकला; विराटसह 'या' खेळाडूंचे पुनरागमन, पहा प्लेइंग 11

श्रीलंकेने टॉस जिंकला; विराटसह 'या' खेळाडूंचे पुनरागमन, पहा प्लेइंग 11

आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबो येथे खेळवला जाणार आहे.
Published on

कोलंबो : आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरेल.

टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेल जखमी झाला आहे. या कारणास्तव भारतीय संघ व्यवस्थापनाने अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला बोलावले आहे. याशिवाय विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले आहे. तसेच, श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. महिष थेक्षाना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. तर, त्याच्या जागी हेमंताला संधी देण्यात आली आहे.

भारताचे प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन:

पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलेग, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com