गतविजेत्या इंग्लंडला श्रीलंकेने लोळवलं; आठ गडी राखून मिळवला विजय

गतविजेत्या इंग्लंडला श्रीलंकेने लोळवलं; आठ गडी राखून मिळवला विजय

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात आज एकदिवसीय विश्वचषकातील 25 वा सामना एकतर्फी झाला. गतविजेत्या इंग्लंड संघाला श्रीलंकेने आठ गडी राखून पराभूत केलं आहे.
Published on

नवी दिल्ली : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात आज एकदिवसीय विश्वचषकातील 25 वा सामना एकतर्फी झाला. गतविजेत्या इंग्लंड संघाला श्रीलंकेने आठ गडी राखून पराभूत केलं आहे. गतविजेत्या इंग्लंडचंच स्पर्धेतील आव्हान जवळपास संपण्यात जमा झाले आहे. पाच सामन्यांपैकी चार सामने इंग्लंडने गमावले आहे. इंग्लंडला न्यूझीलंड, अफगाणिस्तान, द.आफ्रिका आता श्रीलंकेने पराभवाची चव चाखवली आहे.

बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर इंग्लंड आणि श्रीलंका संघांमध्ये सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 156 धावात गारद झाला. इंग्लंडकडून सर्वाधिक 43 धावा बेन स्ट्रोकनं केल्या. तर श्रीलंकेनं टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव रोखण्यात यश मिळवलं. इंग्लंडच्या 156 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने दोन गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. यासाठी त्यांना २६ षटकांचा खेळ करावा लागला.

दरम्यान, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण ७८ एकदिवसीय सामने खेळले गेले. त्यापैकी इंग्लंडच्या संघाने ३८ आणि श्रीलंकेच्या संघाने ३६ सामने जिंकले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com