IND vs SL: श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव करत 2-0 ने जिंकली मालिका

IND vs SL: श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव करत 2-0 ने जिंकली मालिका

भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 110 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आणि संघाने मालिका 2-0 ने गमावली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 110 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आणि संघाने मालिका 2-0 ने गमावली. त्यामुळे भारताने 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली आहे. फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर ड्युनिथ वेलालगेच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 2-0 असा पराभव करून मालिका जिंकली.

1997 नंतर भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाकाली श्रीलंकेने 1997 मध्ये भारताचा शेवटचा 3-0 असा पराभव केला होता. तेव्हापासून भारताने सलग 11 वेळा एकदिवसीय मालिका जिंकली होती, परंतू रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ हा विक्रम कायम राखू शकला नाही आणि 27 वर्षांनंतर त्यांना श्रीलंकेकडून वनडे मालिका गमाववी लागली. यासह भारताचा श्रीलंका दौरा संपला आहे. या दौऱ्यावर भारताने T-20 मालिका 3-0 ने जिंकली होती, मात्र एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला ही गती कायम ठेवता आली नाही.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावून 248 दावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण भारतीय संघ 26.1 षटकांत 138 धावांत सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने 102 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या, तर कुसल मेंडिसने 59 धावांची खेळी केली. गोलंदाजीत, फिरकीपटू ड्युनिथ वेलालगेने चमकदार कामगिरी करत 5.1 षटकात 27 धावांत पाच बळी घेतले. त्याचवेळी महेश तिक्शिना आणि जेफ्री वांडरसे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 35 धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदर 30 दावा करुन बाद झाला आणि विराट कोहली 20 धावा करुन बाद झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com